-भाविकांची मोठी उपस्थिती; संस्थानची महत्त्वपूर्ण घोषणा
लोणार (वाजिद खान) : लोणार येथील ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिर संस्थान (झोपलेला मारुती) येथे मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी अमावस्येनिमित्त विशेष भक्ती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थानच्या वतीने महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली असून, आता दर महिन्याच्या अमावस्येला हा भक्ती सोहळा मंदिरात नियमितपणे आयोजित करण्यात येणार आहे.
संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे की, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सायंकाळी महाआरती, हनुमान चालीसा पठण आणि महाप्रसाद असा निश्चित कार्यक्रम राहील. सर्व भाविकांनी या नियमित भक्ती सोहळ्याची नोंद घेऊन दर अमावस्येला दर्शन व सहभागाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

