ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते किसनलाल शर्मा यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आमदार सिद्धार्थ खरातांची भेट ठरली शेवटची

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील काँग्रेसचे निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ते किसनलाल हिरालाल शर्मा (वय ८५) यांचे आज दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील काँग्रेसचे निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ते किसनलाल हिरालाल शर्मा (वय ८५) यांचे सायंकाळी ६.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

किसनलाल शर्मा हे रोखठोक स्वभावाचे तसेच माणसे जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या आजूबाजूला नेहमी माणसांचा घोळका असायचा. १ जानेवारी रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा ८५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातू व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने देऊळगाव साखरशा परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज  सायंकाळी सुमारे ५ वाजता किसनलाल शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली होती. दुर्दैवाने ही भेट शेवटची ठरली आहे.

आमदार खरात यांची स्व. गजानन अल्हाट कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

देऊळगाव साखरशा येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन सूर्यभान अल्हाट यांचे दि. १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. आज दि. १६ फेब्रुवारी रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, संजय सुळकर, गजानन राठोड, रणजीत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बाळू वानखडे, दिगंबर अल्हाट, शे. गुलाब, रतन सावजी, रामचंद्र साळसुंदर, नरेश साठे, पंडित देशमुख आदी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version