-एकाच रात्रीत ११ शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान, लोणार पोलिसांत गुन्हा दाखल
लोणार (ऋषी दंदाले): लोणार तालुक्यातील हत्ता गावात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारपंपचे स्टार्टर, ऑटो स्विच व इतर अत्यावश्यक साहित्य चोरून नेल्याची घटना १४ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती तात्काळ लोणार पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फिर्यादी श्री. अर्जुन बाबुराव गावंडे यांच्या तक्रारीवरून लोणार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात बी.एन.एस. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गजानन दराडे, रिंढे साहेब आणि प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत. सतत होत असलेल्या अशा चोऱ्यांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

