तब्बल १७ तास राहुल गांधींची चौकशी

editor 1 Min Read
1 Min Read

नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – तुम्हाला जे काय विचारायचे ते आजच विचारा. वारंवार चौकशीला बोलावून लोकांच्या संतापाचा उद्रेक करू नका, आमचे लोकं परेशान होत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकार्‍यांना ठकावले. तब्बल १७ तांस राहुल गांधी यांची चौकशी झाली असून, त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडीच्या अधिकार्‍यांनी गेल्या दोन दिवसांपासून राहुल गांधी यांची चौकशी चालवलेली आहे. राहुल यांना ४० प्रश्न विचारण्यात आले असून, त्याची उत्तरे राहुल गांधी हे देत आहेत. गांधी परिवारावर ५५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असून, त्याची चौकशी ईडी करत आहे. परंतु, त्यांच्या हाती सद्या तरी काहीही ठोस लागलेले नाही. तुमची संपत्ती कुठे आहे, एजीएलमध्ये तुमची भूमिका काय होती, यंग इंडियाचे डायरेक्टर कसे बनलात, नॅशनल हेरॉल्डला काँग्रेसने ९०.९० कोटी रुपये का दिले, आदी प्रश्न राहुल यांना विचारण्यात आले.

Share This Article
Exit mobile version