-इंद्रायणी घाटावर स्वच्छता उपक्रम; उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते इंद्रायणी आरती उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : विजया एकादशी निमित्त आळंदी येथील माऊली मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांतून एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आल्याने श्रींचे रूप अधिकच लक्षवेधी दिसत होते.
अलंकापुरीत इंद्रायणी आरती उत्साहात
इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, आळंदी देवस्थान व नगरपरिषद पदाधिकारी यांच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर हरिनाम गजरात आरती करण्यात आली. केशरबाई कदम, रीना पवार, जयश्री टकले, वर्षा खिल्लारी, पंचफुला तंवर, सरस्वती भागवत, पुष्पा लेंडघर, सुरेखा काळभोर, राधा पगारे, सुवर्णा काळे, मेघा काळे, उषा पाटील, शिवांश पवार, सावित्रीबाई घुंडरे, शीला कुलकर्णी, शालन मेदनकर आदी महिला उपस्थित होत्या. सकाळी स्वच्छता उपक्रम व संध्याकाळी आरती व पसायदान उत्साहात पार पडले. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, आमदार बाबाजी काळे, माउली घुंडरे पाटील, माउली महाराज जाधव तसेच विविध वारकरी शिक्षण संस्था व महाविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
तत्पूर्वी माउली मंदिर महाद्वार विकास कामाच्या अनुषंगाने खान्देशकर गाडेगावकर महाराज धर्मशाळा प्रांगणात वेदमंत्र जयघोषात शिलापूजन करण्यात आले. या वेळी नीलमताई गोऱ्हे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सुजाता तापकीर, प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, योगी निरंजननाथ, सुरेश वडगावकर, श्रीधर कुऱ्हाडे, डी. डी. भोसले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विजया एकादशी निमित्त आळंदीत धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले. इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजीशेठ काळे यांची उपस्थिती लाभली. आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट मंदिरात कल्याण महाराज कल्याणकर यांची कीर्तन सेवा झाली.

