आळंदी मेडिकल असोसिएशन तर्फे स्वच्छता उपक्रमास साहित्य सुपूर्द

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासाठी २ हजार मास्क व २ हजार हॅन्ड ग्लोज भेट

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानास समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानास सहकार्य करत आळंदी मेडिकल असोसिएशनने सामाजिक बांधिलकीतून २ हजार मास्क व २ हजार हॅन्ड ग्लोज आळंदी नगरपरिषदेकडे विनामूल्य भेट देत सुपूर्द केले.

स्वच्छता अभियानात सहभागी होणाऱ्या नागरिक, विद्यार्थी व स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे साहित्य उपयुक्त ठरणार आहे. आळंदी मेडिकल असोसिएशनने दिलेल्या सहकार्यामुळे अभियान अधिक सुरक्षित व प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने या सामाजिक उपक्रमासाठी आळंदी मेडिकल असोसिएशनचे आभार व्यक्त करण्यात आले. अशा सहकार्यामुळे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान ही लोकचळवळ म्हणून अधिक बळकट होत असल्याचेही नमूद करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरपरिषद गटनेते सचिन गिलबिले यांच्या हस्ते साहित्य नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आले. महाराष्ट्र राज्य डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मनोजकुमार रांका, आळंदी डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. विकास पाटील, डॉ. नितीनकुमार जाधव, डॉ. अंबालाल पाटील तसेच नगरपरिषद आरोग्य विभागातील अधिकारी अर्चना भिसे आदी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version