भीमशक्ती संघटनेच्या जिल्हा संघटकपदी अनिल समुद्र; तालुकाध्यक्षपदी विलास कांबळे यांची निवड

editor 1 Min Read
1 Min Read

कर्जत (प्रतिनिधी) : माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती संघटनेच्या जिल्हा संघटकपदी अनिल समुद्र तर तालुकाध्यक्षपदी विलास कांबळे यांची आज कर्जत मध्ये झालेल्या बैठकीत निवड करण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी दिले.

कर्जत येथे भिमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.  बैठकीच्या अध्यक्षस्थान प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कर्डक हे होते.  यावेळी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी भीमशक्ती संघटना जिल्ह्यात कार्यरत करण्यात येत असून, प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी निवडीचे काम आपण स्वतः करत आहोत, या अंतर्गत जिल्ह्यामध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी अनुभवी व सर्वपरिचित असलेले अनिल समुद्र यांच्याकडे जिल्हा प्रमुख संघटक म्हणून जबाबदारी सोपवत आहोत.  याच बरोबर तालुकाध्यक्ष म्हणून विलास कांबळे यांची निवड करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले.  यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख दादासाहेब शिंदे, जिल्हा सरचिटणीस अभिजीत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.  प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कर्डक यांनी बोलताना मागासवर्गीय, अल्पसंख्याक, कामगार, क कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही काम करत असल्याचे म्हटले,  बैठकीच्या शेवटी या निवडी बद्दल अनिल समुद्र यांनी सर्वांचे आभार मानले.

Share This Article
Exit mobile version