आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भजनसम्राट संगीतरत्न पं. कल्याणजी गायकवाड शिष्य परिवार यांचे वतीने तसेच महागायिका कार्तिकी गायकवाड यांचे संकल्पनेतून संगीतरत्न पं. कल्याणजी गायकवाड यांचे वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून आळंदी येथील सिध्दबेटात महागायिका कार्तिकी गायकवाड परिवाराचे हस्ते वृक्षारोपण उत्साहात करण्यात आले.
या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, भजनसम्राट संगीतरत्न पं. कल्याणजी गायकवाड, महागायिका कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड,कैवल्य गायकवाड, शेतकरी बचाव आंदोलन अध्यक्ष गजानन गाडेकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, माऊलीदास महाराज, दिनकर तांबे, भागवत काटकर, दिगंबर महाराज नरवडे,संजय महाराज कावळे यांचेसह पं. कल्याणजी गायकवाड शिष्य व परिवार मोठ्या संख्येने वृक्षारोपणास उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून पं. कल्याणजी गायकवाड यांचा वाढदिवस आळंदीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात सामाजिक, धार्मिक, संगीत श्रवण मेजवानी, तीर्थक्षेत्र आळंदीतील संत लीला भूमीत पर्यावरण पूरक वृक्षारोपण उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला.

