सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाची मेहकर आगार कार्यकारिणी जाहीर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-तेजराव तेजनकर अध्यक्षपदी, गजानन धोटे सचिवपदी सर्वानुमते बिनविरोध निवड

लोणार (वाजिद खान): भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेल्या सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्याच्या मेहकर आगाराची नवनिर्वाचित कार्यकारिणी दि. 27 जानेवारी 2026 रोजी बिनविरोध जाहीर करण्यात आली. संघाचे राज्य अध्यक्ष मा. आ. गोपीचंद पडळकर, मुख्य कार्याध्यक्ष मा. आ. सदाभाऊ खोत तसेच सरचिटणीस मा. सतीश मेटकरी यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात विविध आगारांमध्ये कार्यकारिणीच्या निवडी होत असून, त्याचाच एक भाग म्हणून मेहकर आगाराची निवड प्रक्रिया शांततापूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या निवडीत आगार अध्यक्षपदी श्री. तेजराव तेजनकर यांची, तर सचिवपदी श्री. गजानन धोटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून सुवर्णसिंग जाट, सहसचिव गणेश मोसंबे, कोषाध्यक्ष नारायण साबळे, प्रसिद्धीप्रमुख गजानन उबाळे, उपाध्यक्ष भगवान कांबळे व प्रतापराव राजगुरू, महिला प्रतिनिधी शिल्पा धोटे तसेच कर्मचारी प्रतिनिधी अंगतराव चव्हाण यांचीही निवड करण्यात आली. या निवडीसाठी राज्य सरचिटणीस सुनील पाटील, बुलढाणा विभागाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आनंदे, सतीश पाटील तेजनकर, सचिन लोखंडे, दत्ताभाऊ ढवळे, छगनराव मुळे, गणेश जाधव, रामेश्वर ठाकरे, रवी खेडकर, पुरुषोत्तम टिकार, अंकुश पाटील शिंदे, संतोष सोनूने, जी. एम. वाघमारे, राजू तळेकर, शंकर राठोड यांच्यासह बुलढाणा विभागातील सर्व आगारांचे पदाधिकारी व मेहकर आगारातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना राज्य सरचिटणीस सुनील पाटील व ज्येष्ठ नेते शिवाजी आनंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींसाठी संघ खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही दिली. तसेच सतीश पाटील तेजनकर व छगनराव मुळे यांनीही खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आगारात संघटनेचे सभासद वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहकर आगाराचे व्यवस्थापक श्री. हर्षल साबळे यांची भेट घेऊन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आगार व्यवस्थापकांनीही कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.

Share This Article
Exit mobile version