LIVE: बारामतीत महाराष्ट्राच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अखेरचा निरोप!

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

LIVE: महाराष्ट्राच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अखेरचा निरोप...

अजितदादांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून अखेरचा निरोप दिला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. बारामतीचा कायापालट पाहण्यासाठी याआधी अनेकदा उत्साहात आलेले अमित शहा आज मात्र अत्यंत जड अंतःकरणाने बारामतीत दाखल झाले. अजित पवार हे केवळ राज्याचे नेते नव्हते, तर सहकार क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान आणि थेट संवाद साधण्याची हातोटी ही राष्ट्रीय पातळीवरही कौतुकाचा विषय होती. अमित शहा यांनी यावेळी पवार कुटुंबाचे सांत्वन केले आणि अजित पवारांच्या ‘शब्द पाळण्याच्या’ वृत्तीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

Share This Article
Exit mobile version