महाराष्ट्राने दूरदृष्टी चा नेता गमावला :आमदार सिद्धार्थ खरात

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-जनसंवाद कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली!

मेहकर (तालुका प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. अजित पवार हे आज ( २८ जानेवारी ) सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते बारामतीला सभा घेण्यासाठी येत होते. या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.अजित पवारांच्या अशा अकाली जाण्याने महाराष्ट्रातून आता हळहळ व्यक्त केली जात आहे, अजित दादा हे अत्यंत निर्भीड आणि स्पष्ट भूमिका घेणारे, खमके राजकारणी होते,त्यांची काम करण्याची वेगळी शैली होती त्यांचे काम मी जवळून पहिले आहे त्याच्या सोबत अनेक वेळा काम करण्याची संधी मिळाळी त्यांच्या जाण्याने एक चांगला दूरदृष्टी चा नेता या महाराष्ट्राने गमावला अशी भावुक प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या डोणगाव रोड वरील जनसंवाद कार्यालयात अजित दादा पवार यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी,उपजिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे, डॉ नंदकिशोर गारोळे,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका प्रमुख सागर पाटिल यांनी शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली, या वेळी तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, संदिप गारोळे,बोरी सर्कल प्रमुख अमोल बोरे, दत्ताभाऊ घनवट, ऋषिकेश जगताप,रमेशबापू देशमुख, गबाजी गवई,अजयदीप खडसे, रवींद्र वाघ, देवानंद वानखेडे,भागवत बोरकर यांच्यासह वाडगावमाळी येथिल महिला मंडळ यांनी श्रद्धांजली वाहिली.

Share This Article
Exit mobile version