-अंधश्रद्धा निर्मूलनासह सामाजिक सेवांचा व्यापक संदेश
सिंदखेडराजा (अशोक इंगळे): जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन दि. २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बालाजीनगरी, धोंडीराज मठ, जालना रोड, देऊळगांव राजा (जि. दक्षिण बुलडाणा) येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाबाबत माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, सहपीठ प्रमुख श्री खंडागळे साहेब, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, सहव्यवस्थापक श्री ऋषिकेश बिरारी, पीठ इंजिनियर श्री दीपक चिंचोले, पीठ समिती सदस्य श्री संतोष दसरे, पीठ महिला निरीक्षक सौ. लताताई दीपक चिंचोले तसेच पीठ प्रसिद्धी प्रमुख श्री अमर इधोळ (दक्षिण बुलडाणा) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त संस्थानाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिरे, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, तसेच मोफत रुग्णवाहिका सेवा यांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर ५३ रुग्णवाहिका २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे राबविण्यात येतात. जानेवारी २०२६ मध्ये अवघ्या १५ दिवसांत १,७१,१५० रक्तकुपिकांचे संकलन करण्यात आले. तसेच “एक पेड माँ के नाम” या वृक्षारोपण उपक्रमांतर्गत नोव्हेंबर २०२५ मध्ये १,११,४२४ वृक्षांचे रोपण करण्यात आले असून आजपर्यंत १७६ देहदान व ११७ अवयवदान रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेतून पार पडले आहेत.
या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त पश्चिम विदर्भ पीठांतर्गत दक्षिण बुलडाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका समित्या, सेवाकेंद्र समित्या, आरती समितीचे कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य व हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान पादुका दर्शन, उपासक दीक्षा, गुरुपूजन हे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या सोहळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षेसाठी नोंदणी करून सहकुटुंब उपस्थित राहून परमश्रद्धेय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण बुलडाणा जिल्हा सेवाध्यक्ष श्री गणेश खडोळ, जिल्हा महिलाध्यक्ष सौ. आशाताई निभोंरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री रमेश गुजर, देऊळगांव राजा तालुकाध्यक्ष श्री गणेश बोराटे यांच्यासह संपूर्ण जिल्हा सेवा समितीने केले आहे.

