दारू ढोसून मास्तर शाळेत आला, चड्डीतच मुतला!

editor 2 Min Read
2 Min Read

Amravati | मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल ; पाहा शिक्षकाचा प्रताप

– शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश, गावकर्‍यांची हकालपट्टीची मागणी

मेळघाट (जि.अमरावती) – अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेत आज धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथील शाळेतील शिक्षक चक्क दारू ढोसून शाळेत आला. विद्यार्थ्यांना आज सुटी आहे म्हणून सांगितले आणि वर्गातच झोपला. एवढेच नाही तर हा दारूडा मास्तर पॅण्टमध्येच मुतल्याचेही दिसून आले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून, शिक्षण विभागाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. तर गावकर्‍यांनी या शिक्षकाची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

याबाबत वर्गातील विद्यार्थ्याना विचारले असता, सर सकाळीच दारू पिऊन आले होते. असे विद्यार्थ्यांनी सांगितले. असे कृत्य सरांनी पहिल्यांदाच केले असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच, गावातील गावकर्‍यांनी संताप व्यक्त केला. या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे. जिल्हा परिषद शाळा काकरमल येथील शिक्षक पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण (वय ३८) याने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना शाळेला सुटी झाल्याचे सांगितले. यानंतर मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोपून गेला व तिथेच मुतला. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. यानंतर पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला असता, उलट तो पालकांवरच दादागिरी करत होता. याबाबतचा व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी या व्हिडिओचे प्रसारण केले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत शाळेतील शिक्षक दारू पिऊन वर्गात विचित्र अवस्थेत झोपी गेला आहे. त्याचवेळी आपल्याला ऑफ प्रेड मिळाला म्हणून वर्गातील मुलेही धिंगाणा घालताना दिसत आहेत. अशातच एक व्यक्ती वर्गात येतो आणि या दारूड्या शिक्षकाला जागी करतो. इतकेच नाही तर, तो त्याला प्रश्नदेखील विचारतो. त्यानंतर हा शिक्षक वर्गातून हलत-डुलतच बाहेर जातो. धक्कादायक बाब म्हणजे, या शिक्षिकाने चक्क जीन्समध्येच लघवीही केलेली दिसते.

Share This Article
Exit mobile version