साखरखेर्डा येथे तरुणाचा दुर्दैवी अंत; नितीन चिंधोटे यांचे अपघाती निधन!

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-वाशिम दौर्‍यात घडलेला अपघात, उपचारादरम्यान मृत्यू

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील नितीन रामप्रसाद चिंधोटे (वय ३०) यांचे आज, १९ जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व दोन बहिणी असा परिवार आहे.

नितीन चिंधोटे हे कामानिमित्त वाशिम येथे गेले असता त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या अकाली निधनामुळे साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली आहे. आज दुपारी रोकडोबा हनुमान मंदिराच्या मागील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांच्यासह अनेक नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. दोन लहान चिमुकल्यांना पोरके करून नितीन यांनी जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version