-विझोरा परिसरात हळहळ व्यक्त
सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : विझोरा (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) येथील रहिवासी तसेच सामाजिक व कौटुंबिक जीवनात स्नेहशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रलेखा नारायणराव भानुसे यांचे शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी रात्री २ वाजता वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण विझोरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रलेखा भानुसे या प्रेमळ स्वभाव, कुटुंबवत्सल वृत्ती आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या व्यक्ती म्हणून परिचित होत्या. नातेसंबंध जपणारी, शांत व समंजस भूमिका ही त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून अनेक नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दुःख व्यक्त केले. त्यांचा अंत्यविधी शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी शोकाकुल वातावरणात पार पडला.
त्यांचा रक्षाविसर्जन व इतर सर्व धार्मिक विधी बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता विझोरा (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) येथे होणार आहेत. त्यांच्या पश्चात पुत्र डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे, नातवंडे तसेच आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

