-मरकळच्या पवन्सूत शाळेचा सांस्कृतिक उपक्रम
आळंदी (अर्जुन मेदनकर): आधुनिक काळात लुप्त होत चाललेली लोकनृत्य कला जपली जावी व ती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने मरकळ येथील श्री केशवराज शिक्षण संस्थेच्या पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘श्री केशवराज महाराज करंडक लोकनृत्य स्पर्धा’ मोठ्या उत्साहात पार पडली. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे हे प्रमुख आकर्षण ठरले.
शाळेचे प्राचार्य मिलिंद नखाते व सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून तसेच सुयोग्य नियोजनातून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही विद्यार्थ्यांचा व शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण १२ शाळांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांत पार पडली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक – अॅपेक्स इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली
द्वितीय क्रमांक – नवीन माध्यमिक विद्यालय, मरकळ
तृतीय क्रमांक – पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूल, मरकळ
लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक – किड्स पॅराडाईज स्कूल, आळंदी
द्वितीय क्रमांक – लर्निंग ट्री स्कूल, वराळे
तृतीय क्रमांक – पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूल, मरकळ
स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे व करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये रोख बक्षिसे देण्यात आली. इयत्ता ८ वी ते १० वी गटासाठीची बक्षिसे मरकळ गावचे सरपंच हनुमंत लोखंडे यांनी दिली, तर लहान गटासाठीची १० हजार रुपयांची बक्षिसे उद्योजक जयसिंगराव लोखंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
पारितोषिक वितरण समारंभास श्री केशवराज शिक्षण संस्थेचे सचिव राहुल जनार्धन शिंदे, स्नेहा प्रीकास्टचे डायरेक्टर प्रवीण चौधरी, संस्थेचे संचालक तुकाराम वहिले, खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक किरण लोखंडे, उपसरपंच बाळासाहेब लोखंडे, संचालक शंकरभाऊ लोखंडे, एकनाथ वरपे, नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या छाया लाटे, पर्यवेक्षक शंकर जाचक, विभागप्रमुख संतोष आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत लोककलेचे महत्त्व अधोरेखित केले. सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देत पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूलने या स्पर्धेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला असून भविष्यात अशा उपक्रमांची परंपरा कायम ठेवली जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

