-शरद पवार गट व शिंदे गटाचे गटनेते जाहीर
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव नगरपरिषदेत स्वतंत्र गटांची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगरसेवक गटनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) कडून चार नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला असून, या गटाच्या गटनेतेपदी नगरसेवक वजीरभाई पठाण यांची निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडूनही चार नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला असून, या गटाच्या गटनेत्या म्हणून सौ. माया मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सौ. माया मुंढे या सध्या शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आहेत. या नव्या नियुक्त्यांमुळे शेवगाव नगरपरिषदेच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास आली असून, आगामी काळात नगरपरिषदेतील निर्णय प्रक्रियेत या गटांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

