65 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून

breakingmah 1 Min Read
1 Min Read

खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र):- तालुक्यातील उमरा लासुरा येथे 65 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना 19 ऑगस्ट रोजी रात्री 8 च्या सुमारास उघडकीस आली आहे.तर खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास करीत आहे.

खामगाव तालुक्यातील उमरा लासुरा येथील 65 वर्षीय कमलाबाई जनार्दन सोनोने या महिलेचा 19 ऑगस्ट रोजी अज्ञात इसमाने गळा दाबून खून करण्यात खून केल्याची घटना रात्री 8 च्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नाईकनवरे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून पंचनामा सुरू आहे. तर या घटनेमुळे उमरा लासुरा परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी  फरार  झाला आहे. तर महिलेचा खून करण्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहे वृत्तलीहेपर्यंत तपास सुरू होता

Share This Article
Exit mobile version