-विजय स्तंभाला समता सैनिक दलाची सलामी; शूर वीरांना मानवंदना
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : मलकापूर पांग्रा येथे भीमा कोरेगावचा २०८ वा शौर्यदिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला.यानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने विजय स्तंभाला मानवंदना देत भीमा कोरेगाव युद्धातील शूर वीरांना सलामी अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिमान साळवे, अमोल पैठणे, सुनील साळवे, कैलास साळवे, अरुण लहाने, सागर मोरे, खडोबा काकडे, नंदकिशोर साळवे, सुनील बनसोडे, पवन साळवे, संतोष साळवे, परमेश्वर साळवे, एकनाथ साळवे, सुनील मगर, नवनाथ मगर, अक्षय मगर, सुनील काकडे, भीमराव साळवे, विलास मोरे, संदीप शिनगारे, पंकज साळवे, सूरज मगर, पंढरी मगर, प्रदीप मगर, धर्मा काकडे, गौतम साळवे, शैलेश आराख आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक शरद साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गंगाराम उबाळे यांनी मानले.

