मेहकर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तरुणांचा ओघ सुरूच!

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-चिंचोली बोरे येथील असंख्य युवकांचा पक्षात प्रवेश

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ओघ सुरूच असून, आज २६ डिसेंबर रोजी चिंचोली बोरे येथील असंख्य युवकांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह उपजिल्हाप्रमुख आशिष राहाटे, नगराध्यक्ष किशोर गारोळे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, समन्वयक संजय वडतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत स्थानिक जनसंवाद कार्यालयात पक्षात प्रवेश केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये पवन शरद राजगुरू, निखिल हरिदास बोरे, शिवम अर्जुन गावंडे, शंतनु विनोद राजगुरू, गजानन चिंधाजी बोरे यांच्यासह असंख्य युवकांचा समावेश आहे. सदर युवकांनी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत विकासकामांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.

यावेळी युवा तालुका अधिकारी अँड. आकाश घोडे, सर्कल प्रमुख अमोल मोरे, पवन राजगुरू, संग्राम बोरे, विष्णू बोरे, वैभव वाळूकर, हिम्मत बोरे, ओम बोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तरुणांचे वाढते इनकमिंग पाहता मेहकर मतदारसंघात पक्षसंघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Share This Article
Exit mobile version