– उद्या बाईक रॅलीतून बोल्हेगावातून रणशिंग फुंकणार!
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये आता लढाई संपल्यातच जमा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार व कर्तृत्ववान उद्योजक बाबूशेठ (आप्पा) नागरगोजे आणि नगरसेवक कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या, २७ डिसेंबर २०२५ रोजी भव्य बाईक रॅली काढण्यात येणार असून, या रॅलीतून विरोधकांना थेट राजकीय इशारा मिळणार आहे.
बोल्हेगाव गावठाणातील मारुती मंदिरातून सकाळी १० वाजता या बाईक रॅलीचा प्रारंभ होणार आहे. बोल्होबा चौक, संत तुकाराम जॉगिंग पार्क, घुले कॉलेज चौक, भगवान बाबा चौक, राजमुद्रा चौक (बालाजी नगर), आंबेडकर चौक, गणेश चौक, बोल्हेगाव फाटा ते गांधीनगर–नागापूर परिसर असा रॅलीचा दणदणीत मार्ग असणार आहे. प्रत्येक चौकात राष्ट्रवादींच्या उमेदवारांचा जयघोष घुमणार असून प्रभाग ८ राष्ट्रवादीमय होणार आहे.
विकासकामांची ठोस कामगिरी, जनतेशी थेट नाळ आणि कार्यकर्त्यांची फौज यामुळे बाबूशेठ नागरगोजे यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरला आहे. मतदारांचा कौल आधीच ठरलेला असून, प्रचंड मताधिक्याने राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, हे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या रॅलीत बोल्हेगाव, गांधीनगर, नागापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रभाग ८ मध्ये ‘सामना’ स्पष्ट आहे – जनता राष्ट्रवादीसोबत, विजय नागरगोजेंचाच!

