ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर; जिल्ह्यात राजकीय हालचाली सुरु!

editor 1 Min Read
1 Min Read

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्ह्यात १४९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यासाठी ग्रामीण भागातील राजकारणात चांगली जंगल रंगणार असल्याचे दिसून येत आहे.  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २४ ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.  त्यासाठी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी करणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती २० ऑगस्ट रोजी होणार आहे.

सर्वाधिक ग्रामपंचायत या नंदुरबार तालुक्यांतील ७५ त्यानंतर शहादा तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधमाळी सुरू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष त्यासाठी तयारी करीत आहेत.  राष्ट्रवादीदेखील सर्व ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार किंवा पॅनेल उभे करणार असल्याने इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २० ऑगस्ट रोजी होणार आहेत.  राष्ट्रवादी भवन, गिरिविहार गेट येथे दुपारी चार वाजता होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी दिली.  इच्छुकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version