-विद्यार्थी घडवणुकीसाठी रा.से.यो. शिबिर महत्त्वाचे – मान्यवरांचे मत
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : भारत शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित जानकीदेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) शिबिराचे दत्तक गाव कोनड खुर्द येथे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष शेनफडराव घुबे होते, तर उद्घाटक म्हणून विवेकानंद विद्यालयाचे सचिव एस. टी. गोरे यांनी उपस्थिती दर्शविली.
ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी विद्यार्थी दशेतच समाज व देशाच्या विकासाच्या दृष्टीने अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगत, आपल्या जीवनातील अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडले. अध्यक्षीय भाषणात शेनफडराव घुबे यांनी रा.से.यो. शिबिर हे श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन तसेच नैतिक व आध्यात्मिक जागृतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. जानकीदेवी विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजानन मिसाळ यांनी केले, तर कार्यक्रमाची रूपरेषा प्रा. उद्धव घुबे यांनी मांडली. सूत्रसंचालन कु. अनुराधा दरेकर व कु. खुशी जाट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डी. व्ही. थुट्टे, प्रा. अमोल डुकरे, प्रा. चव्हाण, प्रा. कऱ्हाडे, प्रा. संतोष मिसाळ, पूनम पाडोळे मॅडम यांच्यासह शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.

