गौरवास्पद..! राजर्षी शाहू मल्टिस्टेटला ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ पुरस्कार

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-सहकार मंथन राज्यस्तरीय कार्यक्रमात पुण्यात मिळाला सन्मान

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) :  जागतिक सहकार वर्षाच्या औचित्यावर ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संयुक्त उपक्रमाने आयोजित सहकार मंथन राज्यस्तरीय कार्यक्रमात राजर्षी शाहू मल्टिस्टेटला प्रतिष्ठित ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी २१ डिसेंबर रोजी पुण्यातील कॉसमॉस को-ऑप. बँकेच्या सहकार सभागृहात हा सन्मान स्वीकारला.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देत, राजर्षी शाहू मल्टिस्टेटने ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. बँकिंग सेवेसोबतच सामाजिक उपक्रम राबवण्यालाही संस्थेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. संस्थेच्या यशस्वी कामगिरीमुळे अनेक पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. नुकताच मिळालेल्या ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्काराने संस्थेची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.

हा पुरस्कार सोहळा गौतम कोतवाल (अध्यक्ष, ग्रीन वर्ल्ड; लीड जीडब्ल्यू फाऊंडेशन; तज्ञ संचालक, राजगुरुनगर सह बँक लि.) आणि कॉसमॉस बँकेच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. देशभरातून हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. पुरस्कार प्रदान करताना राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, कॉसमॉस को-ऑप. बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सीए मिलिंद काळे, आस्थापना अधिकारी पवन सावळे, मुंबई विभागीय व्यवस्थापक चेतन गवते, तसेच पिंपरी चिंचवड शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने उपस्थित होते.

संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी सांगितले, “ठेवीदार, ग्राहक आणि खातेदारांचा विश्वास तसेच संस्थेच्या सहकारातील भरीव योगदानामुळे आतापर्यंत प्रत्येक यशाचा टप्पा गाठता आला आहे. दर्जेदार सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”

Share This Article
Exit mobile version