-माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी रचला नवा इतिहास; सर्वाधिक मताधिक्याने विजय
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांना १२ हजार ७२४ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांना ६ हजार ३४ मते मिळाली. प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत दहाव्या फेरीअखेर ६ हजार ६९० मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला.
प्रभागनिहाय निकालात भाजपच्या उमेदवारांनी स्पष्ट मताधिक्याने विजय मिळवला. प्रभाग २ (अ) मधून भाजपच्या वैजयंता अशोक उमरगेकर यांनी १८६२ मते मिळवत १५४८ मतांची आघाडी घेत नवा इतिहास रचला. नगराध्यक्ष पडण्याची परंपरा मोडीत काढत त्यांनी विजयाची नवी परंपरा निर्माण केली. प्रभाग ५ (ब) मधून भाजपच्या खुशी सागर बोरुंदिया यांनी १७०२ मते मिळवत १२९७ मतांची आघाडी घेतली.
प्रभाग ८ (अ) मधून भाजपचे माजी उपनगराध्यक्ष सचिन रामदास गिलबिले ९६४ मतांच्या आघाडीने विजयी झाले, तर प्रभाग ७ (ब) मधून सुनील ज्ञानेश्वर घुंडरे यांनी ७२६ मतांनी विजय मिळवला. प्रभाग ४ (ब) मधून भाजपचे गोविंदा उर्फ सागर कुऱ्हाडे ५५४ मतांनी, प्रभाग ५ (अ) मधून संतोष मारुती रासकर ५३३ मतांनी, प्रभाग ६ (अ) मधून साक्षी अक्षय कुऱ्हाडे, प्रभाग ९ (अ) मधून माजी नगरसेवक दिनेश रामदास घुले ४३३ मतांनी, तर प्रभाग २ (ब) मधून माजी उपाध्यक्ष रामचंद्र दत्तात्रय भोसले ३४९ मतांच्या आघाडीने विजयी झाले.
प्रभाग १० (ब) मधून भाजपच्या ऋतुजा अनिकेत तापकीर २३१ मतांच्या आघाडीने विजयी झाल्या. प्रभाग ६ (ब) मधून हेमंत गुलाबराव कुऱ्हाडे १६८ मतांनी, प्रभाग ४ (अ) मधून कांचन किरण येळवंडे १५४ मतांनी, प्रभाग ३ (अ) मधून पूजा संजय घुंडरे ७५ मतांनी, तर प्रभाग ३ (ब) मधून सोमनाथ कुंडलिक कुऱ्हाडे अवघ्या ५१ मतांच्या फरकाने निसटता विजयी झाले. प्रभाग ८ (ब) मधून भाजपच्या सुजाता कालिदास तापकीर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी केली. शिवसेना (शिंदे गट) चे चार उमेदवार निवडून आले. प्रभाग १ (अ) मधून ऋतुजा आदित्य घुंडरे यांनी ६०३ मतांची आघाडी घेतली, तर प्रभाग १ (ब) मधून आदित्य हनुमंत घुंडरे ५५७ मतांनी विजयी झाले. प्रभाग १० (अ) मधून उद्योजक सुरेश खंडेराव झोंबाडे यांनी २५९ मतांच्या आघाडीने तिसऱ्या प्रयत्नात विजय मिळवला, तर प्रभाग ७ (अ) मधून अरुणा ज्ञानेश्वर घुंडरे यांनी १२० मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.
आळंदीतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला दोन जागांवर समाधान मानावे लागले. प्रभाग १० (क) मधून उज्वला दीपक काळे यांनी ६९९ मतांची आघाडी घेतली, तर प्रभाग ९ (ब) मधून अर्चना विजय तापकीर यांनी केवळ २५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने आळंदीत निवडणूक लढवली नव्हती. या निवडणुकीदरम्यान आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवून शांतता व सुव्यवस्था राखली.
आळंदी नगरपरिषद – पक्षीय बलाबल :
नगराध्यक्ष – प्रशांत कुऱ्हाडे पाटील (भाजप)
भाजप – १५ | शिवसेना – ४ | राष्ट्रवादी काँग्रेस – २
एकूण जागा – २१

