– देऊळगावमाळीत येथे घडत आहे मॅटवरील मल्ल
मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – पूर्वी कुस्तीचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे देऊळगाव माळी होते. काळाच्या ओघात आता कुस्ती ही कलाच लोप पावत चालली. कुस्ती हा महाराष्ट्रातील खेळ लाल मातीत खेळल्या जाणारा खेळ हा टिकला पाहिजे याची संवर्धन झाले पाहिजे, व त्याला आधुनिकतेची जोड लागावी यासाठी क्रांतिसूर्य व्यायाम शाळेचे सर्वे-सर्वा किसन बळी व क्रांतीसुर्य क्रीडा तालीम संघचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याच अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव माळी (ता.मेहकर) येथे मॅटवरील कुस्ती प्रशिक्षण मल्लांना देण्यात आले.
सदर प्रशिक्षण शिबिर महात्मा फुले विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. त्या शिबिराची यशस्वी सांगता मान्यवर मंडळी व क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत झाली. या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून सारंग परदेशी, व क्रांती सूर्यक्रीडा तालीम संघाचे अध्यक्ष किसन बळी यांचे कुस्ती मल्लांना मार्गदर्शन लाभले. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच किशोर गाभणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेता प्रकाश डोंगरे, प्राचार्य विश्वनाथ बाहेकर, भगवान सुरूशे, गणेशराव गाभणे , भास्कर ठेकेदार , विशाल मगर, हरी पाटील, दत्ता तायडे, अरुण बळी यांची उपस्थिती लाभली. यावेळी संतोष गिर्हे, रोहिदास डोंगरे, रवी पाटील, क्रीडा शिक्षक व्ही.टी.गवई , संजय जाधव, कलोरे व आप्रे सर या मान्यवर मंडळीचा कुस्तीगिरांच्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वीतीसाठी क्रांतीसुर्य तालीम संघाचे खेळाडू कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. तसेच येत्या दोन-तीन दिवसात किशोर भाऊ यांनी क्रीडाखात्याकडून नुकतीच १०लाख रु. किमतीची नवीन व्यायाम शाळा मंजूर करून आणली, तिचे भूमिपूजन व्यायाम शाळेच्या मैदानावर करण्याची सरपंच किशोर गाभणे यांनी जाहीर केले. तसेच त्यांचे कार्यकाळात तेथे संपूर्ण व्यायाम साहित्य, कंपाऊंडभिंत, क्रीडांगणाचे सपाटीकरण येत्या काळात करून देण्याचे त्यांनी शब्द दिला.सदर कार्यक्रमाचे संचालन कलोरे व जाधव यांनी केले. तसेच शिबिरासाठी प्रकाश डोंगरे, प्राचार्य बाहेकर व विजय राजगुरू यांनी आर्थिक सहाय्य केले, शेवटी आभार प्रदर्शन अरुण बळी यांनी केले.

