बोल्हेगावात विकासाचा धडाका; माताजी नगरचा रस्ता अखेर काँक्रिटचा!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– मोठी विकासकासे, केल्याचे समाधान: अशोक बडे
– माजी सभागृहनेते अशोक बडे यांच्या विकासकामांच्या जोरावर उद्योगक बाबुराव नागरगोजे यांचा विजय निश्चित!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – बोल्हेगाव परिसरातील माताजी नगर येथील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनच्या मूलभूत मागणीला अखेर न्याय मिळाला असून, येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामास अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत बडे यांच्या विकासकामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उद्योगक बाबुराव नागरगोजे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

माताजी नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था होती. पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. या समस्येमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. ही बाब लक्षात घेऊन अशोक बडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामास मंजुरी मिळवून दिली. या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत, “मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच खऱ्या विकासाचे लक्षण आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना अशोक बडे म्हणाले, “माताजी नगर परिसरातील रस्ते, पाणी व स्वच्छतेच्या समस्या सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. गेल्या पंधरा वर्षांत या भागात नियोजनबद्ध विकासकामे करण्यात आली असून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकासकामे सुरू असताना नागरिकांनी सहकार्य करावे.” कार्यक्रमास उद्योगक बाबुराव नागरगोजे, माजी नगरसेविका आशा बडे, केशव नागरगोजे, विष्णू भोर, महादेव ठोबे, अर्जुन साठे, पांडुरंग पालवे, बाबासाहेब गायकवाड, रामदास लोटे, नवनाथ कारखडे, सचिन कोकरे, संजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते. रस्ता काँक्रिटीकरणामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुरळीत होणार असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी होणार आहेत. या विकासकामामुळे माताजी नगरच्या एकूणच विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share This Article
Exit mobile version