गुंजाळा गावात पुन्हा काळ्या वाणूंचा सुळसुळाट!

editor 2 Min Read
2 Min Read

मेरा बु , ता. चिखली (प्रताप माेरे) :  मागील वर्षी  गुंजाळा गावात काळ्या वाणूने आक्रमण करुण घरा घरात प्रवेश केला होता आणि गावकऱ्यांना विविध आजाराला सामोरे जावे लागले होते .  आता पुन्हा गावात काळ्या वाणूंचा सुळसुळाट वाढल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गुंजाळा गावाची लोकसंख्या दिड ते दोन हजाराच्या जवळपास असून ग्रा.प. सरपंच व सदस्य संख्या आठ आहे .  या गावामध्ये सचिव म्हणून धनवे हे काम पाहतात तर कृषी सहायक गवई , तलाठी जाधव , हे कार्यरत आहेत मात्र मेरा बु उपकेंद्राला दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात फिरकतच नाहीत .  त्यामुळे गुंजाळा गावकऱ्यांना विविध आजाराला नेहमीच सामोरे जावे लागत आहे .

गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने गावात लहानांपासून तर वयोवृध्द रुग्णांचे हाल होत आहे . विविध आजाराणे थैमान घातल्याने रुग्ण त्रस्त होवून गेले आहेत .  आजारी रुग्णांना उपचारासाठी खाजगी डॉक्टरांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे असे असतांना आता पुन्हा गुंजाळा गावात  गेल्या १० ते १५ दिवसापासून काळ्या वाणूंने आक्रमक करुण गावामध्ये ग्रा.प. कार्यालय , अंगणवाडी शाळा , नागरिकांचे बसण्या उठण्याचे सार्वजनिक ठिकाणी , रस्त्यावर , घरा घरात प्रवेश करीत आहेत .  त्यामुळे रस्त्यावरून जातांना येतांना वाणूं पायाखाली दबून मरण पावतात .  वाणूंचा पायाखाली कडकड आवाज येत असल्याने गावकऱ्यांना घराबाहेर पडणे अवघड होऊन गेले आहे .  दररोज वाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने अनेकांच्या घरात , भिंतीवर वानुने आगमन होत आहे,  तसेच घरामध्ये वापरण्याच्या भांड्यावर , कपड्यावर दिसून येत असल्याने नागरिकांना जेवण करणे , पाणी पितांना मळमळ होत आहे .

याबाबत अनेकांना काळे वाणू कोणत्या औषधीने नाहीसे होतील असे विचारले असता कोणीही काहीही सांगण्यास तयार नाही .  जर या वाणूंची लवकरात लवकर विल्हेवाट लावली नाही तर प्रत्येक घराघरात वाणूंचे आक्रमण होऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येवून गावात राहणे अवघड होईल .  त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ गावात पसर लेल्या काळ्या वाणूंची विल्हेवाट लावावी अशी मागणी गावकऱ्यां कडून होत आहे .

Share This Article
Exit mobile version