उतावळी प्रकल्पातून सोडले कालव्याला पाणी, तब्बल ७ हजार एकर जमीन येणार सिंचनाखाली!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

भिंतीवर वाढलेल्या झाडा झुडपांनी धरणाला धोका, दाट झाडीत बिबट्याच्या मुक्कामाचीही धास्ती!

मेहकर  (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पाचे पाणी आज १२ डिसेंबर रोजी कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडण्यात आले. सदर प्रकल्पातील‌ पाण्यावर ७ हजार एकराचेवर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान सदर उतावळी प्रकल्पाचे भिंतीवर झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा धरणाला देखील धोका निर्माण झाला असून या दाट झाडीत बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी सह इतरही धास्तावले आहेत.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी नदी प्रकल्प यावर्षी देखील तुडुंब भरला आहे. सदर धरणाच्या पाण्यावर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा, नायगाव देशमुख,पारखेड सह ,अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील राहेर, अडगाव, पिंपळखुटा, खेट्री, पांगरा,उमरा, चतारी, चांगेफळ,चान्नीसह काही गावांतील शेती सिंचनाखाली येते. या पाण्यावर गव्हू, भूईमुग सह ईतर पिके घेतली जातात. रब्बी साठी सदर प्रकल्पातील पाणी सोडण्यासाठी उपविभागीय अधिकारी लोहार यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता सांगळे, कर्मचारी फिरके, कनिष्ठ लिपिक गजानन ढाले सह ईतरांनी अवश्यक उपाययोजना केल्या .आज १२ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्य रणजित देशमुख, जेष्ठ पत्रकार बाळू वानखडे यांचे हस्ते प्रकल्पातील पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. ‌यावेळी दिलीप देशमुख, गजानन चव्हाण,बाळू चव्हाण सह आदी उपस्थित होते. सदर प्रकल्पातील पाण्यावर अडीच हजार हेक्टरचे वर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांनी पाणीपट्टीचा भरणा करावा असे या विभागाचे कनिष्ठ लिपिक गजानन ढाले यांनी सांगितले. दरम्यान सदर प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे झुडपे वाढली असून याचा धरणाला देखील धोका निर्माण झाला आहे.याच दाट झाडवणात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरी सह नागरिक धास्तावले आहेत . तरी सदर झाडेझुडपे तोडण्याची मागणी होत आहे.

Share This Article
Exit mobile version