– बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्यासह ठीकठिकाणी झाला सत्कार
चिखली (तालुका प्रतिनिधी) – दिल्ली येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘द ग्रेट इंडियन पार्लामेंट २०२२’च्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले असून, हा पुरस्कार विदर्भातील एकमेव, सामान्य कुटुंबातील युवा नेतृत्व अनिल मोरे यांना मिळाल्याने, त्यांचा ठीकठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी यांनीही त्यांचा सत्कार केला आहे.
अनिल मोरे हे शेतकरी कुटुंबातील युवा नेतृत्व असून, आपल्या कार्यातून शेतकर्यांना नेहमीच न्याय देण्याचे काम ते करत असतात. ही एक गावासाठी अभिमानाची बाब आहे, म्हणून गावकरी यांनीही मोरे यांचा सत्कार केला. १४ ऑगस्टरोजी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यानिमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील युवकाचा गल्ली ते दिल्ली असा अभिमानास्पद प्रवास झाला आहे. मोरे हे सतत समाजातील गोरगरीब, गरजू, अनाथ लोंकाना सढळ हाताने मदत करत, माणुसकीचा वारसा जपत आले आहेत. समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असली तरी ते अग्रेसर होऊन, त्या समस्याला तोंड देण्याचे काम सतत करत असतात. या सर्व पुरस्काराचे मानकरी माझे सर्व सहकारी व तसेच ज्या समाजातील लोकांनी मला या ठिकाणापर्यंत पाठवले ते आहेत, असे यावेळी अनिल मोरे यांनी सांगून, सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.