राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत सहकार विद्या मंदिर, बिबीच्या गणेश नरवाडेने पटकावले कास्यपदक!

admin 1 Min Read
1 Min Read

– किक बॉक्सिंगमध्ये ग्रामीण प्रतिभेची राज्यभरात नोंद

बिबी (ऋषी ऋषी दंदाले)-  गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत सहकार विद्या मंदिर, बिबी शाळेच्या गणेश नरवाडे या विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदकावर नाव कोरले.

४ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सहकार विद्या मंदिर, बिबी शाळेचे दोन विद्यार्थी — गणेश नरवाडे आणि शैलेश सोळंके — यांनी सहभाग नोंदवला. जिल्हास्तरावर अव्वल ठरून विभागीय फेरी पार करत राज्यस्तरापर्यंत मजल मारताना गणेशने दमदार खेळी सादर केली. अखेरच्या लढतीत प्रभावी कौशल्य दाखवत त्याने कास्यपदक पटकावले. तर शैलेश सोळंके याला प्रोत्साहनपर प्रमाणपत्र मिळाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानं राज्यस्तरावर मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे. इंग्रजी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांची सर्वांगीण प्रगती साधण्याचे काम संस्था सातत्याने करीत असून गणेशच्या यशातून त्याचीच प्रचीती आली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डहाळके सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाईजी, विद्यमान अध्यक्ष डॉ. सुकेजी झंवर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलजी झंवर, मुख्याध्यापक सचिन खरात सर तसेच शिक्षक व कर्मचारी वर्गाने केले आहे. स्पर्धेनंतर परिसरात गणेश नरवाडेवर कौतुकाचा वर्षाव होत असून गावात आनंदाचे वातावरण आहे.

Share This Article
Exit mobile version