प्रभाग ८ मध्ये बाबूशेठ नागरगोजेंचीच लाट! विजयाची आता फक्त औपचारिकता!

admin 2 Min Read
2 Min Read

– बोल्हेगाव–एमआयडीसीत जबरदस्त प्रतिसाद; निवडून देण्याची नागरिकांची एकमुखी ग्वाही!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार आणि प्रसिद्ध उद्योगपती बाबूशेठ नागरगोजे यांची जोरदार लाट उसळली आहे. बोल्हेगाव व एमआयडीसी भागातील भेट दौर्याने निवडणुकीचे वातावरण तापले असून, उत्साहात नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे नागरगोजे यांचा विजय आता केवळ औपचारिकता राहिल्याची चर्चा रंगली आहे.

मंगळवार (९ डिसेंबर) रोजी बाबूशेठ नागरगोजे यांनी प्रभागातील बोल्हेगाव फाटा, अक्षय कॉलनी, भंडारी कॉलनी, दंडवते कॉलनी, विजय नगर, नम्रता हॉटेल परिसर, गुरुदत्त कॉलनी, साईनगर तसेच राजमाता–शिक्षक कॉलनी भागात घरफेरी व भेटी घेतल्या. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. ‘आम्ही तुम्हालाच मतदान करणार’ असा आवाज सातत्याने घुमत होता. प्रभागात माजी सभापती आणि नगरसेवक अशोक बडे यांच्या कार्यकाळात पार पडलेल्या विकासकामांचा परिणाम आता थेट नागरगोजे यांच्या मताधिक्यावर दिसत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सार्वजनिक सुविधा—या सर्व क्षेत्रात प्रभागातील कामे ‘गेमचेंजर’ ठरली आहेत. त्यामुळेच बडे यांनी स्वतः निवडणूक मैदानातून बाजूला होत संपूर्ण यंत्रणा नागरगोजे यांच्या प्रचारासाठी झोकून दिली असल्याचे दिसून येते आहे. नागरगोजे कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीची छापही मतदारांवर ठळक आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या नागरगोजे यांना नागरिकांनी तातडीचा व एकमुखी पाठिंबा दिला आहे.


उमेदवारीचे गणित ‘हॉट’!

प्रभाग ८ साठी आमदार संग्राम जगताप यांनी कुमार वाकळे आणि बाबूशेठ नागरगोजे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. उर्वरित दोन जागांसाठी दत्ता पाटील सप्रे कुटुंबातून उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रभागातील निवडणूक समीकरण रंगतदार बनले असून, विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे. सभ्य, सुसंस्कृत व सर्वमान्य नेते म्हणून या वेळी नागरगोजे यांच्याकडे पाहिले जात आहे. मतदारांचा कल पाहता विजय फक्त तारखेच्या घोषणेची वाट पाहत आहे, एवढेच!

Share This Article
Exit mobile version