एक इशारा… आणि मिळाली दिवसा वीज!

admin 1 Min Read
1 Min Read

-सहदेव लाड यांच्या प्रयत्नाला यश : मांडवा शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू!

बिबी (ऋषी दंदाले) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या प्रभावी पाठपुराव्याला अखेर यश आले असून, मांडवा येथील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्यास विद्युत विभागाने सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लहर निर्माण झाली आहे.

रब्बी हंगामात पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यावश्यक असताना, मांडवा येथील शेतकऱ्यांना फक्त रात्रीच्या वेळीच वीजपुरवठा होत होता. कडाक्याच्या थंडीत शेतात जाणे, अंधारात काम करणे, साप-विंचू आणि जंगली प्राण्यांचा धोका—यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सततच्या त्रासाबाबत शेतकऱ्यांनी सहदेव लाड यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर लाड यांनी तात्काळ सहाय्यक अभियंता, बीबी कार्यालयात लेखी निवेदन देत दोन दिवसांत दिवसा वीजपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेची दखल घेत विद्युत विभागाने तत्काळ निर्णय घेत मांडवा शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यास सुरुवात केली. वीजपुरवठा दिवसा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त करत सहदेव लाड यांचे आभार मानले आहेत.

Share This Article
Exit mobile version