आळंदी–मरकळ दत्तमय; पुष्पसजावट, कीर्तन आणि अन्नदानात भाविकांचा उसळता सहभाग

breakingmah 3 Min Read
3 Min Read

– भाविकांची मोठी उपस्थिती, अन्नदान व पालखी मिरवणुकीने सोहळ्याला अविस्मरणीय रंग

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी पंचक्रोशीत दत्तजन्मोत्सव भाविकांच्या उत्साहात तर मरकळ परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या गजरात जल्लोषात साजरा करण्यात आला. दत्तभक्त ताई माऊली महाराज यांच्या प्रेरणा व सहकार्याने आयोजित या हरिनाम सप्ताहाला परिसरातील भाविक, दत्तभक्त, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगता सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार गोरक्षनाथ महाराज वर्पे यांनी सुस्वर, हृदयस्पर्शी कीर्तन सेवेतून भक्तिमय वातावरण भारावून टाकले.

आळंदीतील विविध दत्त मंदिरांतही दत्तजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. मंदिर परिसरात केलेल्या आकर्षक पुष्पसजावटीने भाविकांचे लक्ष वेधले. काल्याच्या कीर्तनानंतर पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांच्या वतीने महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले. मरकळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.सांगता समारंभात अखंड हरिनाम सप्ताहात सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यात आले. दत्तजन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, होम–हवन, यज्ञ, कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, प्रासादिक कार्यक्रम अशा विविध धार्मिक उपक्रमांतून भक्तिमय परंपरांचे पालन करण्यात आले. ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व श्रद्धाताई पांचाळ, अनुजा ननवरे व गुरुप्रसाद शिवशेहे यांनी केले, तर गुरुचरित्र पारायणाचे व्यासपीठ गोरक्षनाथ महाराज वर्पे यांनी सांभाळले. मरकळ येथील क्षेत्रपाध्ये वामन काका मरकळे यांनी वेदमंत्रांच्या घोषात दत्तयज्ञ, लघुरुद्र, दत्तयाग आदी धार्मिक सेवा पार पाडल्या. अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे काकडा, नित्यआरती, गुरुचरित्र व ज्ञानेश्वरी पारायण, होम–हवन, गाथाभजन, हरिपाठ, रात्रीची आरती, हरिकीर्तन, हरीजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत पार पडले. दत्तजन्मोत्सवानिमित्त भाऊसाहेब महाराज यादव, भक्ती दीदी पांचाळ, दत्तात्रय महाराज माशेरे, गजानन महाराज गारडे, बाळासाहेब महाराज शेवाळे, एकनाथ महाराज शिंदे, दत्तात्रय महाराज सुरतकर यांच्या कीर्तनासह गोरक्ष महाराज वर्पे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता हरिनाम गजरात झाली. भजनी सेवेत इंद्रायणी भजन मंडळ, जोगेश्वरी महिला भजन मंडळ, गडकर महिला भजन मंडळ, साई महिला भजन मंडळ, कानिफनाथ भजन मंडळ, भानोबा भजन मंडळ, वाघजाई महिला भजन मंडळ, नागेश्वर भजन मंडळ या भजनी मंडळांनी पालखी मिरवणुकीतही उत्साहाने सहभाग नोंदवला.विशेष अन्नदान सेवेत अर्जुन वाकचौरे, बबन पवळे, राहुल वागस्कर, मारुती आरदाळकर, पंडित बिरासदार, बाळासाहेब होले, दत्ताभाऊ थिटे, रोहिदास कदम, विजय लबडे, गोरक्ष दरेकर, रामदास साकोरे, किरण साकोरे यांच्यासह अनेक सेवेकऱ्यांनी परिश्रम घेत महाप्रसाद वाटप केले. विलास तात्या बालवडकर यांनी काल्याच्या महाप्रसादाची व्यवस्था बजावली. दत्तजन्मोत्सव ताई माऊली महाराज यांच्या प्रेरणेत पार पडला. रोहिदास कदम, काळुराम घेणंद, प्रतीक पांचाळ, मानव महाराज पाटील, अरुणा गौंड, बबन पवळे, अर्जुन मेदनकर, कैलास होले, बजरंग सुतार, मरकळ ग्रामस्थ, पदाधिकारी, मरकळ सोसायटी पदाधिकारी, ग्रामपंचायत आजी–माजी सदस्य तसेच पंचलिंग श्री गुरुदेव दत्त प्रतिष्ठाण यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version