विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

editor 1 Min Read
1 Min Read

पैठण (तालुका प्रतिनिधी) – पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा येथील शिवारातील संदीप मदन पवार (वय २६) यांचा गुरुवार सकाळी विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील , असा परिवार आहे.

गेवराई मर्दा येथील शेतकरी संदीप पवार हे गुरुवार सकाळी ८:००वाजता लाईट आल्यावर आपल्या शेतातील विहिरीवर वीजपंप चालू करायला गेले असता विजेचा शॉक लागून ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते.  घरी का येत नाही म्हणून शेतात बघायला त्यांच्या पत्नी गेल्यावर पती जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसले त्यांनी हंबरडा फोडला.  यानंतर आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना औरंगाबाद येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  सदर घटनेची पोलिसांत खबर मिळाली असून, मृत संदीप पवार हे घरातील कर्ते व परिवाराची जबाबदारी त्याच्यावर होती.  या घटनेमुळे गेवराई मर्दा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे , उपनिरीक्षक सुरेश माळी करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version