परमहंस श्री तेजस्वी महाराजांची प्रकृती चिंताजनक; वरोडीमध्ये भक्तांची गर्दी!

admin 1 Min Read
1 Min Read

– मुखदर्शनासाठी हजारो भाविकांची वरोडीकडे रीघ; भजनी मंडळांकडून जागरण; भाविकांकडून प्रार्थना सुरू!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – तीर्थक्षेत्र वरोडीचे अधिष्ठाता परमहंस श्री तेजस्वी महाराज यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती संस्थानतर्पेâ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. बातमी समजताच परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, हजारो भाविक दर्शनासाठी वरोडीकडे धाव घेत आहेत.

दि. २८ नोव्हेंबर रोजी महाराजांचा ९० वा जन्मोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच तब्येतीत बिघाड झाल्याने भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. अचानक आलेल्या या वार्तेने साखरखेर्डा, मेहकर, चिखली, लोणार तालुक्यातील अनेक गावांत चिंता पसरली. मिळेल त्या वाहनाने भाविकांनी वरोडी गाठली असून, संस्थान परिसर दिवसभर गर्दीने फुलून गेला. महाराजांची तब्येत चिंताजनक असल्याने अनेक भक्तांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘माऊलीष्ठ माऊली’ असा जयघोष सुरू असताना भजनी मंडळींनी जागरण करत महाराजांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी अखंड प्रार्थना सुरू केली. काही वेळ महाराजांनी उठून भक्तांना दर्शन दिले, तेव्हा भाविकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. दुपारपर्यंत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. वरोडी गाव तसेच परिसरातील सर्वच भागातून श्रद्धेची लाट उसळली असून भक्तांची पावले सतत संस्थानाकडे वळत आहेत.

वरोडी येथे भाविकांची गर्दी.
Share This Article
Exit mobile version