मेहुणाराजा परिसरात अवैध रेती वाहतूक; स्वराज ट्रॅक्टर जप्त!

admin 1 Min Read
1 Min Read

– मंडळ अधिकारी हिरवे व ग्राम महसुल अधिकारी जाधव यांची मध्यरात्री धडक तपासणी!

देऊळगावराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील मेहुणा राजा येथे अवैध रेती उपसा व वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने मध्यरात्री धडक मोहीम राबवली. गुरुवारी (28 नोव्हेंबर) पहाटे दोनच्या सुमारास पुणेरी हॉटेलसमोर स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर रेतीसह संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. मंडळ अधिकारी विजय हिरवे आणि ग्राम महसूल अधिकारी सुमित जाधव यांनी तत्काळ ट्रॅक्टरला थांबवून जप्ती पंचनामा केला. नंतर वाहनासह ट्रॅक्टर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत ट्रॅक्टर चालक : सचिन खिल्लारे मालक शंकर भागिले यांची नावे समोर आली आहेत. अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून अशा कारवाया सुरू असून परिसरात या हालचालीमुळे खळबळ उडाली आहे. पुढील तपास महसूल विभाग व पोलीस करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version