दोन वर्षांपासून बेपत्ता तरुणी पुण्यात सापडली!

admin 1 Min Read
1 Min Read

– किनगावराजा पोलिसांनी बाणेरमधून घेतले दोघे ताब्यात!

सिंदखेडराजा सुरेश हुसे) – तालुक्यातील किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत 2023 पासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या तपासाला अखेर यश मिळाले. अपराध क्र. 226/2023, कलम 363 भादवी अंतर्गत दाखल प्रकरणात पाहिजे आरोपीसह तरुणी पुण्यातील बाणेर—सुतारवाडी परिसरात गुप्तहेरांच्या मदतीने सापडली.

गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या मोबाईल नंबरवरून लोकेशन विश्लेषण करून पोलिसांनी अचानक छापा टाकला. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने दोघांना ताब्यात घेऊन किनगाव राजा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पीडित मुलीचा सविस्तर जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात BNSS 183 प्रमाणे तिचा जबाब देण्यात आला. तिचे आई-वडील यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून माहिती देण्यात आली आणि त्यांचा जबाबही घेतला. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, पीडित मुलगी हिने तिला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आरोपीशी लग्न केले आहे. त्यामुळे तिच्या पालकांच्या संमतीने तिला नवऱ्याच्या ताब्यात देण्यात आले.सदर या प्रकरणी किनगावराजाचे ठाणेदार संजय मातोंडकर, HC/1245 विष्णू मुंढे, LHC/1763 सोनल चव्हाण, PC/2624 विजेता पवार, PC/2629 मिलिंद सोनपसारे, LPC/226 ज्योती ननवरे, PC/2363 कैलास ठोंबरे (TAW) . किनगाव राजा पोलीसांच्या प्रयत्नांमुळे दोन वर्षे बेपत्ता असलेली तरूणी सुखरूप मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share This Article
Exit mobile version