ई-केवायसी नसल्याने अनुदान अडकलं; आज सिंदखेडराजा तालुक्यात महाशिबीर!

admin 1 Min Read
1 Min Read

– अतिवृष्टीत उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – अतिवृष्टीच्या तडाख्याने भरडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठे अनुदान जाहीर केले असून त्याची रक्कम तालुक्यातील अनेकांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. मात्र eKYC अपूर्ण असल्याने जवळपास हजारो शेतकऱ्यांचे अनुदान बँकेतच ‘होल्ड’ अवस्थेत अडकले आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजित दिवटे यांनी थेट आणि कडक शब्दांत शेतकऱ्यांना इशारा देत आवाहन केले, की “eKYC केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही… तात्काळ CSC केंद्रावर जा आणि प्रक्रिया पूर्ण करा!” त्यासाठी गुरूवारी (दि.27) सिंदखेडराजा तालुक्यात महाशिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांना परत परत चकरा माराव्या लागू नयेत आणि अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यात विशेष eKYC शिबीरांचे मोठे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी महसूल विभाग आणि CSC कर्मचाऱ्यांची विशेष तैनाती केली जाणार आहे. हे शिबीर तहसील कार्यालय, सिंदखेडराजा, किनगाव राजा (मंडळ स्तर), दुसरबीड (मंडळ स्तर), सोनोशी (मंडळ स्तर), मलकापूर पांग्रा (मंडळ स्तर), शेंदुर्जन (मंडळ स्तर), साखरखेर्डा (मंडळ स्तर) येथे आयोजित आहे. तहसीलदार दिवटे म्हणाले, की “सरकारकडून निधी उपलब्ध आहे, फक्त eKYC नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. कोणीही अनुदानापासून वंचित राहू नये म्हणूनच हे शिबीर आयोजित केले. सर्वांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावं.”

Share This Article
Exit mobile version