मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी चिखलीत जाहीर सभा

admin 1 Min Read
1 Min Read

– नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचा करणार प्रचार!
– नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या प्रचाराला ठरणार नवसंजीवनी!

चिखली (राजेश लोखंडे) – चिखली नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिखलीचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या प्रचारासाठी येत असून, चिखलीत भव्य सभेचे आयोजन दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले आहे.

या सभेने भाजपच्या उमेदवारांना नवसंजीवनी मिळणार असून, चिखलीचे राजकीय वातावरण भाजपमय होण्याचे बोलले जात आहे. चिखली मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भव्य सभेचे आयोजन कारण्यात येणार आहे, या सभेने कार्यकर्ते यांच्यात एकच जोश बघायला मिळत आहे. आधीच प्रचारात आघाडी घेतलेल्या भाजपच्या उमेदवाराला ही सभा नक्कीच विजयापर्यंत पोहचवून देईल, अशी राजकीय मंडळीत चर्चा आहे, त्या अनुषंगाने कार्यकर्तेदेखील तितक्याच ताकदीने कामाला लागले आहे. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या जबरदस्त उत्साह आहे. फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे पंडितराव देशमुख यांच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळेल, असा पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. आता या सभेने नगरपालिका निवडणुकीचे वारे कशा पद्धतीने फिरते हेदेखील बघणे तितकेच महत्वाचे आहे.

Share This Article
Exit mobile version