चिखलीत संस्कृतीविरुध्द विकृतीची लढाई : हर्षवर्धन सपकाळ

admin 3 Min Read
3 Min Read

– महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला!

चिखली (राजेश लोखंडे) – जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सुसंस्कृत व सभ्य शहर म्हणून चिखलीचे उदाहरण दिले जायचे. चिखलीत फक्त निवडणुकीपुरते राजकारण असायचे. आता मात्र चिखली शहरात विकृतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, कमळाचा गळ हा नागरिकांसाठी फास झाला आहे. चिखलीत विकासाचा नव्हे तर भ्रष्टाचाराचा खकाणा जिकडे तिकडे दिसत आहे. चिखली शहरातील नगरपालिकेची ही निवडणूक संस्कृती विरुध्द विकृतीची लढाई आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा सभ्येता व संस्कृतीचा विजय असेल. काशिनाथ आप्पाच्या मापात पाप नसून ते शहराच्या सभ्येतेचे व संस्कृतीचे संवर्धन करतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

बुधवार दि. १९ नोव्हेंबररोजी चिखली नगरपालिकेच्या नगरअध्यक्ष पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार काशिनाथआप्पा बोंद्रे यांच्या प्रचाराचा नारळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याहस्ते फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, नागरिकांच्या सुख–दु: खात धावून जाणारे नगरसेवक, नगरअध्यक्ष असतात. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार २४ तास जनसेवेसाठी कटिबध्द असणारे आहेत. महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून, हीच आपल्या विजयाची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पक्षनिरीक्षक राजेंद्र राख, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, संदेश आंबेडकर, महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे, नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष जनार्दन गवारे, ज्योती समाधान बांडे, डॉ. प्रकाश शिंगणे, सौ. उषा साहेबराव डुकरे, श्रीमती सुनिता प्रकाश शिंगणे, रहिम खान पठाण, अंबादास प्रल्हाद खरात, वहिदा बेगम मो. जक्काउल्ला, सौ. सिमा गोपाल देव्हडे, डॉ. मोहमंद इसरार मो.जब्बा, रविंद्र मदन महाजन, सौ. शितल संतोष देशमुख, सौ. संध्या आनंद बोंद्रे, उबेद अली खान भाईजान, सौ. रसिका रवि पेटकर, भारत दयाराम मुलचंदानी, सौ. संगिता विजय गाडेकर, गोपाल मोहन गायकवाड, रत्नदीप यशवंत शिनगारे, सौ. स्वाती अमोल लहाने, सौ. सरस्वती पुरूषोत्तम वायाळ, शेख जाकीर शेख यासीन, सौ.सुप्रिया प्रशांतकुमार भटकर, मो.आसिफ मो. शरिफ, आनंद सुभाष गैची, सौ. रजनी निखील जागृत, सौ. अनिता विनोद बनकर, श्रीराम सखाराम झोरे यांच्यासह कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, तथा विविध सेल विभागाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्त्री,पुरूष नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


बोंद्रे, जनता आणि विजय हे नगरपालिकेचे समिकरण : प्रा. नरेंद्र खेडेकर

चिखली शहराच्या विकासासाठी बोंद्रे घराण्याचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. कर्मयोगी तात्यासाहेब, राहुलभाऊ, प्रियाताई हे जनतेतून निवडून आलेले नगरअध्यक्ष आहेत. त्यांनी कायमच शहराचा भल्याचा विचार केला. आता काशिनाथ आप्पासारखा शांत, संयमी चेहरा आहे. बोंद्रे, जनता आणि विजय हे नगरपालिकेचे समिकरण असल्याने काशिनाथ आप्पाचाच विजय होणार, असे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले.

Share This Article
Exit mobile version