शिंदी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; घर फोडून चार लाखांचा ऐवज लंपास!

admin 2 Min Read
2 Min Read

– रात्रीतून चार ते पाच घरे फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न; परिसरात भीतीचे वातावरण!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – पोलीस स्टेशन अंतर्गत शिंदी येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका घरातून चार लाख किमतीचे दागिने लंपास केले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शिंदी येथील शरद पंढरीनाथ खरात यांच्या घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून रात्री घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोने एक तोळा पोत, एक तोळा गहू मन्याची पोत, १२ तोळे सोने असा ऐवज लंपास केला. आजच्या बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत ४ लाखांच्या आसपास असून, पोलिसांनी शरद पंढरीनाथ खरात यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ३३१(४) , ३०५(ए ) ६४ भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गावात चोरी झाल्याची माहिती सरपंच अशोक खरात यांनी ठाणेदार गजानन करेवाड यांना देताच त्यांनी तत्काळ शिंदी येथील घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, फॉरेन्सिक युनिट, फिंगरप्रिंट एक्स्पर्ट चमुला पाचारण करण्यात आले होते. या चमूने घरातील महत्वाच्या ठिकाणी फिंगरप्रिंट घेतली आहे. तसेच जीवन खरात यांच्या शेतातील बखारीची टेहळणी करीत त्या ठिकाणी दारु पिऊन बॉटल मिळून आली. तिही पोलिसांनी जप्त केली. त्याच बरोबर भगवान वामन बंगाळे यांच्या घराचा कडी कोंडा तोडण्याचा प्रयत्न केला. तर मंगेश बंगाळे यांच्या घराचा सुद्धा कडी कोंडा तोडला होता. एकाच रात्री चार ते पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीनराजे जाधव करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version