चिखलीतील पाच अट्टल गुन्हेगार शहरातून दोन महिन्यांसाठी तडिपार!

admin 2 Min Read
2 Min Read

– नगरपरिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पोलिस अधीक्षकांची कारवाई!
– गणेश चौधरी, ऋषिकेश हिवाळे, आनंद अनपट, गोपाल पाईकराव व मो. परवेज मो. हनीफची शहरातून तडिपारी!

चिखली (राजेश लोखंडे) – येत्या २ डिसेंबररोजी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अट्टल पाच गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. गणेश गंगाराम चौधरी (रा. संभाजीनगर, चिखली), ऋषिकेश विजय हिवाळे (रा. लुंम्बीनीनगर, चिखली), आनंद गुलाबराव अनपट (रा. आनंदनगर, चिखली), गोपाल रामा पाईकराव (रा. एकतानगर, चिखली) आणि मो. परवेज मो. हनीफ (रा. गौरक्षणवाडी, चिखली) अशी तडिपार करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत.

या पाचही गुन्हेगारांवर चोरी, धमकी, मारामारी, अवैध धंदे अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यांच्या उपस्थितीमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने चिखली पोलिसांनी या गुन्हेगारांवर तडिपारीची दोन महिन्यांसाठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे निवडणूक काळात शहरातील व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व नागरिकांना सुरक्षित वातावरण लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात चिखली पोलिसांनी केली आहे.


चिखली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच अट्टल गुन्हेगारांना शहरातून दोन महिन्यांसाठी तडीपार केले आहे. या कारवाईत गणेश गंगाराम चौधरी यांसारख्या गुन्हेगारांचा समावेश आहे, ज्यांना संभाजीनगर परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. 

Share This Article
Exit mobile version