जैन विद्या मंदिर व आदर्श शिशु विहार येथे बालदिनानिमित्त भव्य बालजत्रा!

admin 1 Min Read
1 Min Read

– बालदिन जल्लोषात साजरा

पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड स्टेशन पुणे येथील श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर व आदर्श शिशिर विहार येथे बालदिन अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत बाळचमूसाठी भव्य बालजत्रा व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

बालजत्रेत विविध मनोरंजक खेळ, आकर्षक फूड स्टॉल, कलर्स डे तसेच गाणी, नृत्य आणि मनोरंजक उपक्रमामुळे लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुलांनी अतिशय उत्साहाने सर्व खेळांचा व खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. यासाठी शिशुविहार प्रमुख सौ.शोभा पंगुडवाले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा काटकर, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गांचे मोलाचे सहकार्य लाभले. बालदिनाचे औचित्य साधून शाळेने ‘बालपणातच शिकतो आनंदी जगणे’ हा संदेश दिला. संपूर्ण शाळा परिसर मुलांच्या हसर्‍या चेहर्‍यांनी रंगीबेरंगी वेशभूषा व किलबिलाटाने खुलून गेली होता. या उपक्रमात संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी राजेंद्र कुमार, शंकरलाल मुथा, तसेच सहायक सेक्रेटरी अनिल कुमार, मोतीलाल कांकरिया यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Share This Article
Exit mobile version