इसरूळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भिकनराव भुतेकर बिनविरोध

admin 1 Min Read
1 Min Read

– अध्यक्षपदासाठी आला एकमेव अर्ज; सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव!

चिखली (राजेश लोखंडे) – तालुक्यातील इसरूळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार तथा इसरूळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भिकनराव प्रभतराव भुतेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

इसरूळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी भिकनराव भुतेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. या अर्जावेळी सूचक म्हणून संतोष नारायण गाडेकर तर अनुमोदक म्हणून बालू किसनराव वायाळ यांनी स्वाक्षरी केल्या. हजर असलेल्या ११ संचालकांनी यांना सहमती दर्शविली. यावेळी दोन संचालक गैरहजर होते. पूर्वीच्या अध्यक्षांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव ५/७/२०२५ रोजी राजीनामा दिला होता. संचालक मंडळाच्या २१/७/२०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत तो राजीनामा मंजूर करण्यात आला. त्याच अनुषंगाने अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवार १४/११/२०२५ रोजी निवड प्रक्रिया पार पडली. अध्याशी अधिकारी सतीश जाधव म्हणून काम पाहिले, यावेळी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे सचिव पडघान, इसरूळचे सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, सतीश पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती, ओमप्रकाश भुतेकर, संचालक रामभाऊ जाधव, बाळासाहेब पवार, मनोज भुतेकर, जाकीर शेख, ग्रामसेवा सोसायटीचे उपाध्यक्ष गजानन काळे तसेच संचालक आदी उपस्थितांनी या निवडीचे स्वागत केले.

Share This Article
Exit mobile version