बिहारमध्ये एनडीए सरकारची सत्तावापसी!

admin 1 Min Read
1 Min Read

– भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष; भाजपकडून महाराष्ट्रासह देशभरात जल्लोष!

नवी दिल्ली/पाटणा (आवेश तिवारी) – बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने सत्तावापसी केली आहे. रात्री नऊ वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार, भाजपने ८१ जागा जिंकल्या होत्या, तर जनता दल (यू)ने ७२ जागा व लोकजनशक्ती पक्ष (पासवान)ने १७ जिंकून नेत्रदीपक यश प्राप्त केले होते. तर काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलाची महाआघाडीला बिहारी जनतेने नाकारल्याचे दिसून येत आहे. या राज्यातदेखील लाडकी बहीण योजनेची जादू चालल्याचे दिसून येत असून, वृत्तलिहिपर्यंत राजदला २२ जागा, तर काँग्रेसला ६ जागा मिळालेल्या होत्या. बिहार विधानसभेसाठी ६ व ११ नोव्हेंबररोजी मतदान झाले होते. मतदानाची एकूण टक्केवारी ६६.९१ टक्के इतकी होती.

Share This Article
Exit mobile version