शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचा शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडकणार मोर्चा!

admin 3 Min Read
3 Min Read

– जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे – जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत. न्यायालयीन आदेशानुसार सुरु करण्यात आलेली शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदभरतीदेखील शिक्षण संचालक यांनी परिपत्रक काढून बंद केलेली आहे. माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात तातडीने बैठक बोलावून संघटना पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा घडवून सोडविण्यात यावेत, अन्यथा शिक्षकेतरांच्या मागण्यांसाठी महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वात सोमवार दि.१७ नोव्हेंबररोजी पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यापासून शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या अशा, १) अनेक वर्षापासून बंद असलेली माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी पदभरती भरती तात्काळ सुरु करण्यात यावी. २) चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना २४ वर्षानंतर मिळणार्‍या लाभानुसार त्यांची वेतन निश्चिती करतांना एस ४ मध्ये न करता एस ५ मध्येच करण्यात यावी. ३) शाळातील कर्मचार्‍यांना माध्यमिक राज्य शासकीय कर्मचार्‍याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा १०/२०/३० वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा. ४) माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती देण्यात यावी. ५) माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना देण्यात आलेला२४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचार्‍याप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा. ६) महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने न करता पूर्वीप्रमाणे नियमित वेतनश्रेणीत करण्यात यावी. ७) माध्यमिक शाळातील वरिष्ठ लिपीक,मुख्य लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल अतिरिक्त झाल्यास त्यांना सेवानिवृत्त होईपर्यंत वेतनास व वेतनश्रेणीस संरक्षण मिळावे. ८) कर्मचार्‍यांच्या प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, शिपाई यांच्या वेतनातील त्रुटी तात्काळ दूर करण्यात याव्यात. ९) शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्जित रजा साठवण्याची मर्यादा काढून टाकण्यात यावी. सदर मोर्चामध्ये राज्यातील माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितले. यावेळी राज्याध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, विभागीय सचिव डॉ.विजय टाले, गोवर्धन पांडुळे आदी उपस्थित होते. सदर मोर्चामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे, सचिव शिवाजी बाहेकर, कार्याध्यक्ष सतीष कुळकर्णी उपाध्यक्ष शैलेंद्र महाजन, महिला आघाडी उपाध्यक्षा रेखा ठाकरे, रेखाताई खरे, कोषाध्यक्ष अनिल काकड, अंतर्गत हिशोबनीस मो.रीजवान मो.जाफर, प्रसिद्धी प्रमुख मोहंमद असलम अंजुम, घाटाखालील विभाग प्रमुख शंकरराव भटकर, घाटावरील विभाग प्रमुख बसवेश्वर आखाडे, रामेश्वर मोरे, अविनाश धुमाळ, विनायक भालेराव, तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version