शेंदुर्जन झेडपी गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे सुरेखा अविनाश नागरे यांचा एकमेव अर्ज!

admin 3 Min Read
3 Min Read

– सौ. सुरेखा नागरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार!
– सासर आणि माहेरकडूनही जोरदार पाठिंबा; आ. मनोज कायंदे यांच्यासाठीही निवडणूक ठरेल सोपी!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये शेंदुर्जन सर्कलमध्ये वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. आज बुलढाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पदाधिकारी आणि निरीक्षक यांनी घेतलेल्या मुलाखतीत शेंदुर्जन जिल्हा परिषद गटासाठी सुरेखा अविनाश नागरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

गेल्या १० वर्षांपासून शेंदुर्जन जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारा मतदार या गटात असल्याने बहुसंख्य गावात आमदार मनोज कायंदे यांना मताधिक्य मिळाले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली असली तरी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) पसंती दिली आहे. हा गड काबीज करण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले असून, राजकीय पटलावर नवीन चेहरा म्हणून सुरेखा नागरे यांना समोर केले आहे. गेल्या एक महिन्यापासून म्हणजे आरक्षण जाहीर झाल्यापासून भंडारी येथील माजी सरपंच बाबुराव नागरे यांनी शेंदुर्जन जिल्हा परिषद गटात संपर्क वाढविला आहे. भंडारी ग्रामपंचायत अविरोध निवडून आणून एक आदर्श संपादित केला आहे. ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून कारभार पाहात असताना शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची सर्व समाजात ख्याती आहे. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी त्यांना अनेक लोकांनी गळ घातली. परंतु, महिला राखीव असल्याने त्यांनी सुनबाई सुरेखा तयार असेल तरच! अशी भूमिका घेतली. सुरेखाताई यांचे माहेर शेंदुर्जन गट ग्रामपंचायतमधील रामनगर हे असून, त्यांचे वडील मदनराव कायंदे हे वडील आहेत. अनेक वर्ष ते शेंदुर्जन ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिले आहेत. जनतेला बदल हवा आहे. आज जनता आता उघडपणे बोलू लागली आहे. अनेक दिवस एक हाती सत्ता असलेले शेंदुर्जन सर्कल आता बदल करू पाहत आहे. त्यासाठी जनतेने संपूर्ण सर्कलमध्ये ज्यांचे सलोख्याचे संबंध आहे असे बाबुराव नागरे यांना गळ घालून त्यांची सुनबाई सौ. सुरेखा अविनाश नागरे यांना जिल्हा परिषदेसाठी उभे करावे, अशी मागणीदेखील जनता त्यांच्याकडे करताना दिसत आहे. बाबुराव नागरे एक प्रामाणिक आणि अजातशत्रू असलेले व्यक्तिमत्व. त्यांचे सर्वांचे असलेले चांगले संबंध हा शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुकीचा गाभा ठरण्याची शक्यताही बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक व्यक्ती केंद्रीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच जनतेला बदल हवा आहे, आणि नवीन चेहराही मिळत आहे. हा खर्‍याअर्थाने दुग्धशर्करा योग होऊ शकतो. तसेच भंडारी, कंडारी ही गावे भक्कम पणे उभी असून, संपूर्ण शक्तीनिशी सौ.सुरेखा अविनाश नागरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहेत. तसेच सुरेखाताई अविनाश नागरे यांचे माहेर रामनगर शेंदुर्जन असल्याने शेंदुर्जन नगरीचे माजी उपसरपंच मदनराव कायंदे यांच्या त्या कन्या असल्याने शेंदुरजनमध्येदेखील मोठे मताधिक्य घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नागरे घराणे हे होणार्‍या बदलाचा भाग होऊ शकते का? हे आता येणारा काळच सांगेल. त्यामुळे आता बदल निश्चित अशी जनता सहजपणे बोलत आहे.
—————

Share This Article
Exit mobile version