चिखली नगरपरिषद निवडणुकीसाठी ६१४ कर्मचार्‍यांची नियुक्ती

admin 2 Min Read
2 Min Read

– विविध प्रकारचे २० कक्ष स्थापन; महिलांसाठी राहणार टोल फ्री क्रमांक
– २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला राहणार मतमोजणी

चिखली (राजेश लोखंडे) – येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या चिखली नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून आवश्यकतेनुसार ६१४ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या सर्व कर्मचार्‍यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच, महिलांसाठी 1800-233-2754 हा टाेल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे.

नगरपरिषद निवडणुकीसाठी येत्या दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, दुसर्‍या दिवशी दि.३ डिसेंबररोजी मतमोजणी पार पडणार आहे. या सगळ्या प्रक्रियेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र पोळ, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत बिडकर, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार संतोष काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शहरातील एकूण ६१ मतदान केंद्रावर राबविण्यात येणार आहे. तर मतमोजणी दि. ३ डिसेंबर 2025 रोजी शहरातील तालुका क्रिडा संकुलात पार पडणार असून, या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळासह अतिरिक्त १६४ अधिकारी आणि कर्मचारी कक्षांचे व्यवस्थापन सांभाळतील, तर ४५० कर्मचारी मतदान आणि मतमोजणी पक्रियेत सहभागी राहणार आहेत. असे असतील नेमणूक केलेले अधिकारी- १) निवडणुक निर्णय अधिकारी-१, २) सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी -२, ३) आचार संहिता कक्ष -६, ४) परवाना कक्ष- ५, ५) खर्च व्यवस्थापन कक्ष – ५, ६) निवडणुक साहित्य कक्ष- १०, ७) एफएसटी पथक – २४, ८) एसएसटी पथक – २४, ९) व्हिव्हिटी पथक – ३, १०) व्हिएसटी पथक -६, ११) इतर कक्ष – २४ यांचा समावेश असेल.

Share This Article
Exit mobile version