– देऊळगावराजा नगरपालिकेवर पक्षाची सत्ता मिळविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी!
देऊळगावराजा/बुलढाणा (राजेश लोखंडे) – देऊळगावराजा तालुक्यातील आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योतीताई शिवशंकर खेडेकर यांची देऊळगावराजा नगरपरिषद निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती विदर्भ प्रभारी डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष नरेशदादा शेळके तसेच प्रसेनजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या निवडीबद्दल डॉ. ज्योतीताई खेडेकर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रियाताई सुळे, आणि आमदार रोहित पवार या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत नगराध्यक्षासह जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी डॉ. ज्योतीताई खेडेकर पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या नियुक्तीमुळे देऊळगावराजा तालुक्यात पक्ष संघटनेला नवे बळ मिळेल. तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

